वैशाख शुक्ल एकादशी - मोहिनी स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी - 3 May 2020

वैशाख शुक्ल एकादशी - मोहिनी स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी

एकादशी हा पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला (पंधरवड्यातला) अकरावा दिवस आहे. पंचांगाप्रमाणे महिन्यातला दोन पंधरवड्यांत (पक्षांत) प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादश्या येतात. कधीकधी एका पक्षात स्मार्त आणि भागवत अश्या पाठोपाठ दोन एकादश्या असतात. यामुळे आज ( 3 May 2020 ) स्मार्त एकादशी, तर उद्या ( 4 May 2020 ) भागवत एकादशी आहे. पक्षातल्या आधी येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते.

कुडाळदेशस्थ गौड ब्राह्मण हे पुर्वी शैव होते. पण शंकराचार्य यांनी सनातन धर्माचे पुनरुज्जीवन केले. त्यांनी स्मार्त परंपरा सुरू केली आणि पंचायतन पूजा म्हणजे, गणेश किंवा कार्तिकेय, सूर्य, विष्णू, शिव आणि देवी या पाच रूपांची उपासना करण्यास सांगितले.

गौडब्राह्मण.भारत

Comments